सोन्याचे भाव कडाडले प्रति तोळा ६५ हजारांवर

मुंबई :

सोन्याचे दर आज एक हजार रुपयांनी वाढले. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ६५,००० रुपयांर पोहोचला, तर चांदीचा दर ७४,४०० रुपये किलो झाला. हा भाव राजधानी दिल्लीतला असून तिथे २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना ५८,६०० रुपये मोजावे लागले. मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ५८,७४० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ६४,८५० रुपये प्रति १० ग्रॅम असून चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत ६४,९०० रुपये आहे.

सोन्याची किंमत बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतात. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होते. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था डळमळीत असल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top