सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला प्रथमच ६९ हजार पार

मुंबई :

दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,४२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६८,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७८,२२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७६,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मजुरी शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६३,५२५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६९,३०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,५२५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,३०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,५२५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,३०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,५२५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,३०० रुपये आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top