नवी दिल्ली
ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आठ महिन्यांनंतर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने याबाबतची सुनावणी 3 आठवड्यांनी पुढे ढकलली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
आठ महिन्यांत या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात कोणतीही सुनावणी झाली नाही. आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश करण्यात आला होता. हे प्रकरण आजच्या कामकाजात 39 नंबरवर सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, आज सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांची सुनावणी लांबणीवर
