‘स्पेसबग’मुळे सुनीता विल्यम्सचा अंतराळातील मुक्काम वाढणार

वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अंतराळवरी सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम एका ‘स्पेसबग’मुळे वाढणार आहे. ते व त्यांचे सहकारी बुच बिलमोर आता १८ जूनपर्यंत अंतराळ स्थानकातच राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात एक स्पेसबग आढळला आहे. एंटेरोबॅक्टर बुगांडेन्सिस नावाचा हा जीवाणू विविध औषधांचा प्रतिरोधक आहे. अंतराळस्थानकाच्या बंद वातावरणात तो विकसित झाला असून त्याची शक्ती वाढली आहे. हा जीवाणू अंतराळवीरांच्या श्वसन प्रणालीला संक्रमित करतो. त्यामुळे अंतराळवीरांना होणारा धोका लक्षात घेऊन त्यांचा मुक्काम वाढवण्यात आला आहे. त्यामुळे त्या १८ जून पर्यंत तिथेच राहणार आहेत. त्यानंतर त्या पृथ्वीवर परत येतील. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर ते पृथ्वीच्या परिभ्रमण प्रयोगशाळेत एक आठवडा घालवतील त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचेही नासाने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top