स्वारगेट स्थानकात पाणी साचले तीन दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे
पुण्यात तीन दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने स्वारगेट एसटी बस स्थानकात पाणी साचले होते. तीन दिवसानंतरही ते पाणी अद्यापही तसेच असून त्याकडे स्थानक व्यवस्थापक व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. पुण्यात अनेक आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण केल्याचा दावा करणारे अजित पवार यांच्यावरही लोकांनी याबाबत टीका केली आहे.
पुण्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आला होता. त्यावेळी पुण्याच्या मध्यवर्ती स्वारगेट एसटी बस स्थानकात पाणी साचले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून हे पाणी जैसे थे असून प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहक व चालकांनाही आपल्या बसेसपर्यंत जाण्यात अडचणी येत असून स्थानकातून बसेस बाहेर काढतानाही कसरत करावी लागत आहे. या स्थानकात खड्डे पडले असून त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. पुण्यात अनेक आंतरराष्ट्रीय सुविधा दिल्याचा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही लोकांनी टिका केली आहे. स्वारगेट हे पुण्यातील महत्त्वाचे स्थानक असून इथून अनेक शहरांसाठी बसेस सुटत असतात. असे असतांlनाही सरकारकडून या स्थानकाकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसांच्या पावासामुळे जर हे हाल होत असतील तर पावसाळ्यात या स्थानकाचे काय होईल असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top