हत्येच्या ११ दिवसांनी दिव्याचा मृतदेह कालव्यात सापडला

चंदीगड – गुरुग्रामची मॉडेल दिव्या पाहुजा हिची २ जानेवारी रोजी सिटी पॉइंट हॉटेलच्या रूममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी बलराज नावाच्या व्यक्तीला बंगालमधून अटक केली. बलराजची चौकशी केल्यानंतर त्याने दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले.

दिव्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे २५ सदस्यीय पथक पटियालामध्ये पोहोचले होते. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होते. मात्र दिव्याचा मृतदेह हरियाणातील तोहाना कालव्यात सापडला. पोलिसांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचा फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी दिव्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

मॉडेल दिव्या पाहुजा हिची २ जानेवारी रोजी सिटी पॉइंट हॉटेलच्या रूममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती. यामध्ये मुख्य आरोपी अभिजीत सिंह, हेमराज, ओम प्रकाश, मेघा, बलराज गिल आणि रवी बंगा यांचा समावेश आहे. दिव्या पाहुजा (२७) ही बलदेव नगर, गुरुग्राम येथील रहिवासी होती. या हत्येनंतर बलराज देश सोडून बँकॉकला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी त्याला आणि रवी बंगा याला कोलकाता विमानतळावरून अटक केली. दिव्याची हत्या केल्यानंतर अभिजीतने हॉटेलच्या २ कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिव्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या गाडीत ठेवला. मग त्याने गाडी बलराजकडे दिली आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. या कामासाठी अभिजीतने बलराजला १० लाख रुपयेही दिले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top