हरियाणामध्ये भाविकांच्या बसला आग! ८ जणांचा मृत्यू

चंदीगड

हरियाणातील कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर काल रात्री उशिरा भाविकांच्या बसला अचानक आग लागली. या आगीत ८ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये ६० हून अधिक प्रवासी होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

बसमधील सर्व प्रवासी पंजाब-चंदीगड येथील रहिवासी आहेत. ते मथुरा-वृंदावनला भेट देऊन पंजाबला परतात होते. मात्र त्यांची बस कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर आली असता, अचानक बसला आग लागली. जीव वाचवण्यासाठी काही भाविकांनी धावत्या बसमधून बाहेर उड्या घेतल्या. धावत्या बसला आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग अतिशय भीषण होती. आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top