हावडा मेल ट्रेनमध्ये स्फोट! ४ जण जखमी

चंदीगड- पंजाबच्या सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. ही घटना काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे पोलीस उपअधीक्षक जगमोहन सिंग त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचून त्यांनी डब्याचे पाहणी केली. तपासात एक प्रवासी त्याच्या सामानासह फटाके घेऊन त्याच्या गावी जात होता. त्याने फटाके बादलीत ठेवले होते. बोगीतील विद्युत शॉर्टसर्किटमुळे फटाक्यांना आग लागली आणि स्फोट झाला. या घटनेत एका दाम्पत्यासह चार प्रवासी जखमी झाले. अजय कुमार आणि त्यांची पत्नी संगीता कुमारी, आशुतोष पाल, सोनू कुमार अशी जखमींची नावे आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.