हिरोशिमा बॉम्बस्फोटातील घड्याळ लिलावात तब्बल २५ लाखांत विकले

बोस्टन- ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानमधील हिरोशिमा इथे पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर झालेल्या अणूबाँबच्या स्फोटात वितळलेले एक घड्याळ सापडले होते.या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देणार्‍या या घड्याळाचा नुकताच लिलाव करण्यात आला.या लिलावात हे घड्याळ २५ लाखांहून अधिक किमतीला विकले गेले.

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्याची राजधानी शहर बोस्टनमध्ये या दुर्मिळ ऐतिहासिक घड्याळाचा लिलाव पार पडला.पितळी रंगाचे हे घड्याळ एका ब्रिटिश सैनिकाकडून जप्त करण्यात आले होते.या वितळलेल्या स्थितीतील घड्याळात सकाळी ८.१५ वाजताची वेळ दर्शवित आहे.ज्या व्यक्तीने हे घड्याळ लिलावात खरेदी केले.त्याने आपले नाव उघड केलेले नाही.एका ब्रिटिश सैनिकाला हिरोशिमा शहरातील स्फोटानंतर इमारतीच्या ढिगाऱ्यात हे मनगटी घड्याळ सापडले होते.तत्कालिन युद्धाच्या वेळेची आठवण या घड्याळात बंदिस्त झाली आहे.बोस्टनमधील या लिलावात चीनचे माजी नेते माओ झेडोंग यांच्या ‘ द लिटल रेड बुक ‘ ची स्वाक्षरी केलेल्या एका पुस्तकाची एक प्रतही ठेवण्यात आली होती.या पुस्तकाला अडीच लाख रुपये इतकी किंमत मिळाली.तसेच जॉर्ज वॉशिंग्टन यांची स्वाक्षरी असलेले दोन धनादेशही या लिलावात होते.ते सुद्धा १ लाख ३५ हजार ४७३ रुपयांना विकले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top