हेमंत सोरेनचा ३१ कोटींचा भूखंड ईडीकडून जप्त

रांची – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या सहकार्‍यांची मनी लँडिंगप्रकरणी चौकशी सुरू आहे.या चौकशीचा भाग म्हणून ईडीने सोरेन यांच्या मालकीचा असलेला रांची येथील ८.८६ एकरचा ३१ कोटी रुपये किमतीचा भूखंड जप्त केला आहे,अशी माहिती ईडीच्या अधिकार्‍यांनी दिली.

गेल्या महिन्यात ३० मार्च रोजी ईडीने सोरेन यांच्यासह त्यांचे सहकारी भानू प्रताप प्रसाद,राजकुमार पहान, हिलारियास कच्चप आणि विनोद सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.सरकारी पक्षाच्या तक्रारीची न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली.८.८६ एकरचा भूखंड ताब्यात घेण्याबाबत ईडीने विनंती केली होती.याआधी जानेवारीमध्ये ईडीने याप्रकरणी सोरेन यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी चौकशी करून अटक केली होती. सोरेन यांना सध्या बिरसा मुंडा सेंट्रल जेल,होटवार येथे न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top