हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे निधन

न्यूयॉर्क- हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायपर लॉरी यांचे लॉस एंजेलिसमध्ये काल निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या पायपर लॉरी काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना नऊ वेळा एमी आणि तीन वेळा ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
पाईपर लॉरीने यांनी वयाच्या 18 व्या वर्षी युनिव्हर्सल-इंटरनॅशनल म्हणजेच सध्याच्या युनिव्हर्सल स्टुडिओमधून करिअरची सुरूवात केली. ट्विन पीक्स या लोकप्रिय शोमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्या ओळखल्या जात होत्या. या अभिनयासाठी त्यांना 1990 आणि 1991 मध्ये एमीसाठी नामांकन मिळाले होते. पाईपर लॉरीने रोनाल्ड रीगन, रॉक हडसन, टोनी कर्टिस आणि न्यूमन अशा लोकप्रिय कलाकारांसोबत काम केले होते. पाइपर लॉरी यांनी शेवटच्या 2018 मध्ये व्हाइट बॉय रिक या सिनेमात काम केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top