होळी सणासाठी विशेष रेल्वे गाड्या

मुंबई

होळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल-भुसावळ साप्ताहिक स्पेशल, इंदूर-पुणे साप्ताहिक स्पेशल आणि पुणे-इंदूर साप्ताहिक स्पेशल या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. जबलपूर-दानापूर होळी सुपरफास्ट स्पेशल, दानापूर-जबलपूर होळी सुपरफास्ट स्पेशल, राणी कमलापती (भोपाळ)-दानापूर होळी सुपरफास्ट स्पेशल, दानापूर-राणी कमलापती (भोपाळ) होळी सुपरफास्ट स्पेशल, कोटा-दानापूर होळी एक्स्प्रेस स्पेशल, दानापूर-कोटा होळी एक्स्प्रेस स्पेशल, पुणे-दानापूर विशेष गाडी, दानापूर-पुणे विशेष गाडी, लोकमान्य टिळक-समस्तीपूर सुपर फास्ट स्पेशल, समस्तीपूर-लोकमान्य टिळक सुपर फास्ट स्पेशल, वलसाड-मालदा टाऊन स्पेशल, मालदा टाऊन-वलसाड स्पेशल या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top