१५ दिवस राज्यात उष्णतेची लाट येणार

पुणे – पुण्यासह राज्यात अनेक शहरातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.किमान तापमानासह रात्रीच्या तापमानातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील १५ दिवस उष्णतेची लाट येणार आहे. तसेच पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

गेल्या दोन दिवसात विदर्भामध्ये ४२ अंश सेल्सिअस ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, नाशिक, जळगाव याठिकाणीदेखील चाळीसच्या वर तापमानाचे आकडे जाताना दिसतात, तर सर्वसाधारणपणे गेल्या काही दिवसापासून उष्णतेच्या लाटेला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे मतदार आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमात असताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळी १२ ते दुपार ३ पर्यंत अतिमहत्त्वाचे काम असेल तर बाहेर पडावे, असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top