मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत.मुंबईत भाजपा नेते आणि कार्यकर्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.नड्डा आज आणि उद्या मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
नड्डा यांनी अंधेरी येथे आयोजित कार्यकर्यांच्या संमेलनात मार्गदर्शन केले.त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत ३७० हून जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून काम करणाचे निर्देश कार्यकर्यांना दिले.
नड्डा उद्या २२ फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते नवी मुंबईत मुंबई अश्वमेध गायत्री महायज्ञामध्ये सहभागी होणार आहेत.त्याच दिवशी नड्डा सायन कोळिवाडा येथे लाभार्थी संमेलनालाही संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असल्याने नड्डा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.