३ वर्षांनंतर मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार ‘क्लिन अप मार्शल’ !

मुंबई- मुंबईत अस्वच्छता पुरविणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यासाठी आता पुन्हा क्लिनअप मार्शल दिसणार आहेत.पालिकेच्या ‘ए’ वॉर्डात काल मंगळवारपासून क्लिन अप मार्शलनी आपल्या ड्युटीला सुरुवात केली.आज बुधवारी ‘सी’ वॉर्डात क्लिन अप मार्शल तैनात करण्यात आले होते.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या संकल्पनेतून पुन्हा ही क्लिन अप मार्शल मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी हे क्लिन अप मार्शल हे ऑनलाइन दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्यांच्या मोबाइलमध्ये पालिकेने तयार केलेले ऑनलाइन अ‍ॅप असून त्यांना मोबाईल ब्ल्यूटुथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडासाठी स्वतंत्र पावती मिळणार आहे. यामध्ये अन्य कोणत्याही छापील पावतीचा वापर करता येणार नाही. विशेष म्हणजे दंडाची रक्कम ही क्लिन अप मार्शलच्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान,थुंकणे आणि रस्त्यावर कचरा फेकल्यास या क्लिन अप मार्शलना कमीतकमी १०० आणि जास्तीतजास्त १ हजार रुपये दंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात २५ ते ३० क्लिन अप मार्शल तैनात करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top