अंटार्क्टिकामधील हिमनद्या अतिवेगाने वितळत आहेत

वॉशिंग्टन- दोन्ही ध्रुवांवर जागतिक तापमानवाढीचा परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे अंटार्क्टिकामधील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. हा वेग ताशी ८० मैल म्हणजेच ताशी १२९ किलोमीटर इतका आहे. ग्लेशियर वितळण्याचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक वेग असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील स्टेफनी ऑलिंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इतक्या वेगामुळे एखादी काच फुटून तिचे तुकडे झाल्याप्रमाणे या ग्लेशियर विखरून जातील. हा वेग आमच्या आतापर्यंच्या वेगांपैकी सर्वाधिक आहे. विशिष्ट प्रसंगी ग्लेशियर तुटून ते विखुरले जाऊ शकते हेच या वेगावरून दिसून येते. भविष्यातही अशा घटना घडू शकतात.’ ग्लेशियरच्या वेगाबाबत संशोधकांनी ‘एजीयू अडव्हान्सेस’ या नियतकालिकात माहिती प्रसिध्द केली आहे. याचे संशोधन करण्यासाठी संशोधनासाठी सॅटेलाईट निरीक्षण आणि बर्फाच्या स्तरातील सेस्मिक डेटाचा संयुक्त वापर केला. पश्चिम अंटार्क्टिकाच्या पाईन आयलंड ग्लेशियरवर २०१२ साली १०.५ किलोमीटर लांबीची भेग दिसून आली होती. हे ग्लेशियर बर्फाचा साठा समुद्रात मिसळण्यापासून रोखते. तेच दुभंगत असल्याने अंटार्क्टिकावरील बर्फाचा साठा मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top