न्यूयॉर्क – नासाची भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार विल्मोर सध्या अंतराळात अडकले आहेत. त्यांचा परतीचा प्रवास लांबला असून ते २०२५ मध्ये पृथ्वीवर परतणार आहे.बोइगंचे स्टारलाइयनर यान ५ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी घेऊन अंतराळात गेले होते. त्यानंतर एका आठवडा अंतराळात थांबून त्यांना पुन्हा पृथ्वीवर परतायचे होते. मात्र थ्रस्टर आणि हिलियम गळती झाल्यामुळे ते अंतराळात अडकून पडले. नासाकडून त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्ससोबत नासाचे काम सुरू आहे. नासाने आता २०२५ मध्ये सुनिता आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याची योजना सुरु केली आहे.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







