अंधेरीचा गोखले पूल मार्चमध्ये सुरु होणार

मुंबई

अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक मार्गिका मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुली होणार आहे, असे महापालिकेने सांगितले आहे. यामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १० दिवसांत हे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घटना दिवशीच ह्या पुलाचे लोकापर्ण केले जाईल, असे सांगितले जात आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल नोव्हेंबर २०२२ मध्ये वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर ह्या पुलाचे बांधकाम सुरु करत हा पूल २०२३ मध्ये दिवळीपर्यंत सुरु केला जाईल, असे महापालिकेने सांगितले होते. मात्र ह्या पुलाचे बांधकाम लांबणीवर पडल्याने त्यासाठी १४ फेब्रुवारीची डेडलाई देण्यात आली होती. ही डेडलाईन उलटून गेली आहे. त्यामुळे आता मार्चमध्ये ह्या पुलाची एक मार्गिका सुरु केली जाणार आहे, असे महापालिकेने सांगितले. रस्त्याचे सपाटीकरण, स्ट्रीट लाईट आणि अन्य उर्वरित कामे येत्या १० दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत. पुलाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वे मार्गावरील गार्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या आठवड्याभरापासून रस्त्याच्या सपाटीकरणासह अन्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामे सुरु असून ही कामे अंतिम टप्प्यात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top