अकोला विधानसभा निवडणुक कॉंग्रेसचे उमेदवार साजिद पठाण

नवी दिल्ली- काँग्रेसने काल लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सात जागांसह अकोला पश्चिम आणि कर्नाटकातील शोरापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित केले. त्यामध्ये अकोला पश्चिमच्या जागेसाठी साजिद पठाण यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे सोलापूर पश्चिम साठी पोटनिवडणुक होत आहे.त्यामध्ये शर्मा यांना गेल्या निवडणुकीत कडवी झुंज देणार्‍या साजिद पठाण यांनाच कॉंग्रेसने पुन्हा दुसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे.तर कर्नाटकातील शोरपूर (अनुसूचित जमाती) या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत राजे व्यंकटप्पा नाईक यांचे पुत्र राजा वेणूगोपाल नाईक यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या दोन्ही नावांची घोषणा केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top