अचानक ब्रेक लागला सिमेंटला ट्रल उलटला

पुणे- अचानक सिग्नल लागल्याने सिमेंटने भरलेला ट्रक दोन वाहनांवर उलटला. आज शनिवारी सकाळी १०.२० वाजण्याच्या सुमारास नवले चौकात घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

अपघातग्रस्त ट्रक कात्रजकडून नवलेच्या दिशेने जात होता.त्यावेळी नवले चौकात गतिरोधकाच्या ठिकाणी अचानक सिग्नल लागला.त्यामुळे ट्रक चालकाने सिग्नलवर येऊन एकदम ब्रेक लावला.त्यामुळे ट्रक एका वाहनावर आणि दुचाकीवर उलटला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातानंतर नवले चौकातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. चौकातील सिग्नल बंद करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने वाहने हटविण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top