अजिंठा लेण्यांमध्ये पर्यटकांना उन्हाळ्यात गरम पाणीपुरवठा

छत्रपती संभाजीनगर- देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जिल्ह्यातील पुरातन अजिंठा लेण्यांमध्ये असलेले वॉटर कुलर बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पर्यटकांना नळाचे गरम पाणी प्यावे लागत आहे.
तसेच थंड पाण्यासाठी लेणी परिसरात भटकंती करावी लागत आहे. याबाबत पर्यटकांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अजिंठा लेणी क्रमांक ८,१५ आणि २४ जवळ बसविण्यात आलेल्या नळांमधून पर्यटकांना पिण्यासाठी गरम पाणी मिळत आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग प्रवेश तिकिटांसाठी पर्यटकांकडून ४० रुपये आकारत आहे. पण पर्यटकांना पिण्यायोग्य पाणी देण्यास असमर्थ ठरत असल्याचे मत पर्यटक व्यक्त करत आहेत. याठिकाणी वॉटर कुलर बसविले आहेत. पण ते बंद पडले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top