अजित पवारांचे बारामतीत आई-पत्नीसह मतदान

बारामती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या आई आशाताई अनंतराव पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर संपूर्ण पवार कुटूंबाने शरद पवार यांना साथ दिली, तर अजित पवार एकटे पडले होते. अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या आईसुद्धा शरद पवार यांना साथ देणार, अशा चर्चा होत्या. मात्र आज मतदान केंद्रावर अजित पवार त्यांच्या आईसोबत आले होते. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, आशाताई पवार आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आहेत. माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी. मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, बारामतीतील निवडणूक ही भावकीची आणि गावकीची नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षांचा विकास डोळ्यासमोरच ठेवून मतदान करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top