अझरबैजान किनारी भागात ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप

बाकू

अझरबैजानच्या किनारी भागात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू सुमकायतच्या पूर्वेला कॅस्पियन समुद्रात ६० किलोमीटर अंतरावर आणि ६८ किलोमीटर खोलीवर होता, अशी माहिती अझरबैजानची भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे. या भूंकपााचे धक्के तुर्कमेनिस्तान आणि रशियासारख्या शेजारील देशांनाही जाणवले. या भूकंपात कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी झाली नाही. पण या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top