अटल सेतू वरून पुणे मुंबई शिवनेरी धावणार

मुंबई: शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या ” अटल सेतू “वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) व स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत ११ व दुपारी १ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे. तिकट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. या बस फेऱ्या एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top