Home / News / अदानी केनियात वीज पुरवठा करणार केट्रॅको कंपनीशी सामंजस्य करार

अदानी केनियात वीज पुरवठा करणार केट्रॅको कंपनीशी सामंजस्य करार

नैरोबी – भारतात उद्योगाचे एक एक क्षेत्र व्यापत चाललेल्या अदानी उद्योग समुहाची दौड साता समुद्रापार गेली आहे. आता अदानी समुहातील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नैरोबी – भारतात उद्योगाचे एक एक क्षेत्र व्यापत चाललेल्या अदानी उद्योग समुहाची दौड साता समुद्रापार गेली आहे. आता अदानी समुहातील अदानी एनर्जी ही कंपनी केनियामध्ये वीज पुरवठा करणार आहे. अदानी एनर्जीने नुकताच केनियाच्या केट्रॅको या कंपनीशी ३० वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे.केनियाच्या उर्जा विभागाचे सचिव ओपियो वंदायी यांनी ही माहिती दिली. अदानी समुहाशी झालेल्या करारानुसार देशात वीज वितरणाचे जाळे निर्माण करणे , त्यासाठी आवश्यक गुंतवणूक करणे , वीज वहनासाठी उपकेंद्रांची निर्मिती करणे आणि सुरळीत वीज पुरवठा करणे ही जबाबदारी अदानी एनर्जी सोल्युशन्स या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे,असे वंदायी यांनी सांगितले.या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ९५.६८ अब्ज केनियन शिलिंग एवढा आहे. ही भांडवली गुंतवणूक अदानी एनर्जी आणि केट्रॅको कंपनी स्पर्धात्मक निविदांच्या माध्यमातून उभारणार आहे,असे वंदायी आपल्या निवेदनात म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या