अदानी समूह फिलिपाइन्समधीलबातान बंदर विकसित करणार

  • करण अदानी यांनी
    राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट मनिला
    अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड फिलिपाइन्समध्ये गुंतवणूक करणार असून या कंपनीने फिलिपाइन्समधील बातान येथील बंदर विकसित करण्यात स्वारस्य दाखवले आहे. फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

गौतम अदानी यांचा मुलगा आणि अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांची भेट घेतली. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमध्ये आधीपासूनच कार्यरत आहे. ही कंपनी इस्रायलमधील हैफा बंदर चालवते. ती श्रीलंकेतील कोलंबो बंदराचे वेस्ट कंटेनर टर्मिनल आणि ऑस्ट्रेलियाच्या पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील ॲबॉट पॉइंट टर्मिनलचेही संचालन करत आहे.

फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी फिलिपाइन्समधील अदानी पोर्ट्सच्या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, "कृषी उत्पादने हाताळण्यासाठी बंदरांचा विकास केला पाहिजे, जेणेकरून फिलीपाइन्स जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल."

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top