अनंत अंबानींनी रामनवमीला ५ कोटी रुपयांचे दान केले

दिसपूर –

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांनी मंगळवारी ओडिशातील जगन्नाथ मंदिर आणि आसाममधील कामाख्या मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी जगन्नाथ मंदिर आणि कामाख्या मंदिरात प्रत्येकी २ कोटी ५१ लाखांचे दान केले. माँ बगलामुखी मंदिरातून अनंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दतिया पीठावर पोहोचल्यावर जिल्हाधिकारी संदीप कुमार यांनी अनंत यांचे स्वागत केले. अनंत सुमारे दोन तास मंदिरात होते. चैत्र नवरात्री असल्याने माँ बगलामुखीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी असते. कडेकोट बंदोबस्तात अनंत यांनी माँ बगलामुखी मंदिरात दर्शन घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top