अपंग तरूणीच्या व्हायरल पोस्टनंतर देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली

मुंबई – मुंबईत एका दिव्यांग मुलीला व्हीलचेअरवर बसलेल्या अवस्थेत उचलून दोन जिने वर न्यावे लागले. याबद्दलची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी संताप आणि निराशा व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: गैरसोयीबाबत माफी मागितली.
विराली मोदी नावाच्या मुलीने एक्सवर पोस्ट केली, “मी अपंग आहे आणि माझे लग्न खार मुंबईतील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झाले. ऑफिसमध्ये लिफ्ट नव्हती. ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होते. माझे लग्न होते आणि अधिकारी स्वाक्षरीसाठी खाली येत नाहीत. त्यामुळे मला व्हीलचेअरने दुसऱ्या मजल्यापर्यंत उचलून नेण्यात आले. कार्यालयातील पायऱ्या गंजलेल्या होत्या. माझ्या अपंगत्वाची माहिती अधिकार्‍यांना देऊनही कोणतीही मदत करण्यात आली नाही. लग्नासाठी कार्यालयात नेत असताना पायऱ्यांवरून खाली पडले असते तर काय झाले असते?”
विरालीचे हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत माफी मागितली. “सर्व प्रथम नवीन सुरुवातीबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा दोघांना खूप आनंदी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा! तसेच तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी खरोखर दिलगीर आहे. मी वैयक्तिकरित्या दखल घेतली आहे आणि मी आवश्यक त्या सुधारणा आणि योग्य ती कारवाई नक्की करीन.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top