नवी दिल्ली- देशातील अव्वल विमान वाहतूक सेवा कंपनी एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालविल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. एअर इंडियाने विनाप्रशिक्षित वैमानिकाला विमानाचे उड्डाण करू दिले. यात सुरक्षेचा कसलाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे ही घटना गंभीर असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.









