अफगाणिस्तानकडून भारतातील दूतावास कायमस्वरूपी बंद

काबूल- नवी दिल्लीतील अफगाण दूतावास कायमचा बंद करण्यात आल्याने आता भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहेत. नवी दिल्लीतील आपले राजनैतिक मिशन बंद करण्याबाबत अधिकृत विधान जारी करताना, अफगाण दूतावासाने म्हटले की, भारत सरकारच्या सततच्या आव्हानांमुळे दूतावास आजपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपासून कामकाज बंद केल्यानंतर दूतावासाने हा निर्णय घेतला. भारत आणि अफगाणिस्तान मिशनला सामान्यपणे कार्य करण्यास अनुमती देण्यासाठी भारत सरकारचा दृष्टीकोन अनुकूलपणे बदलेल या आशेने हे पाऊल उचलण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top