अफगाणिस्तान पुन्हा हादरले! ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

काबुल- अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. आज अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात पहाटे ६ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्र जमिनीपासून १० किमी खोलीवर होता, अशी माहिती अमेकिन भूगर्भ संशोधन संस्थेने दिली आहे. हैरात प्रांताच्या आसपासच्या परिसरात हा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी ७ ऑक्टोबरलाही दुपारी अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. एकापाठोपाठ बसलेल्या भूकंपाच्या पाच धक्यानंतर अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या होत्या. आजूबाजूच्या कित्येक प्रांतांमध्ये याचे धक्के जाणवले होते. यात ४००० जणांनी आपला जीव गमावला होता, तर २००० हून अधिक घरे उध्वस्त झाली होती. या भीषण भूकंपानंतर सरकारने तातडीने बचाव आणि मदतकार्यास सुरुवात केली होती. ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांचे शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असताना आज पुन्हा भूकंपाचे धक्के बसले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top