अफगाणिस्तान भूकंपात ४ हजार लोकांचा बळी

काबूल :

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या वाढली आहे. या भूकंपात आतापर्यंत ४ हजार हून अधिक लोकांचा बळी गेल्याचे समजते. तसेच यामध्ये २ हजार हून अधिक घरे उद्ध्वस्त झाल्याचे अफगाण सरकारने सांगितले आहे.

अफगाणिस्तान नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रवक्ते मुल्लाह सैक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आतापर्यंत या दुर्दैवी भूकंपामध्ये ४ हजार नागरिकांचा बळी गेला आहे. सुमारे २० गावांमध्ये जवळपास १,९८० घर उद्ध्वस्त झाली आहेत.”

शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. आजूबाजूच्या कित्येक प्रांतांमध्ये याचे धक्के जाणवले होते. या भीषण भूकंपानंतर सरकारने तातडीने बचाव आणि मदतकार्यास सुरूवात केली होती. सध्या विविध संस्थांच्या एकूण ३५ रेस्क्यू टीम्स भूकंपग्रस्त भागात मदत करत आहेत. यात एकूण १ हजार सदस्य असल्याची माहिती मुल्लाह यांनी दिली. याशिवाय अफगाणिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद यांनी काल भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top