अफगाण वॉर मेमोरिअल चर्च आजपासून सर्वांसाठी खुले

मुंबई

मुंबईच्या कुलाबा येथील १६५ वर्ष जुन्या अफगाण वॉर मेमोरियल चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाने पूर्ण केले आहे. उद्या अफगाण वॉर मेमोरिअल चर्च पाद्री समितीकडे सुपूर्द केला जाणार आहे. यानिमित्ताने समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सुपूर्द सोहळा पार पडल्यानंतर चर्च सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहे.

वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाने सीआयटीआयकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून आणि अफगाण वॉर मेमोरियल चर्चची पास्टोरेट समिती आणि कस्टोडियनच्या सहकार्याने नूतनीकरणाचे काम पूर्ण केले. चर्चचे छप्पर, विद्युत दिवे, लाकडी बाके व खुर्च्या, जमिनीचा भाग, चर्चबाहेरील संकुलाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यासाठी ४० ते ५० कुशल कामगार व तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. चर्चच्या नूतनीकरणासाठी एकूण १४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जीर्णोद्धार प्रकल्प मार्च २०२२ मध्ये सुरू झाला. २४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला. अफगाण चर्च हे भारतातील चर्चच्या वास्तुकलेतील एक उल्लेखनीय रत्न आहे’, असे मत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि वर्ल्ड मोन्युमेंट्स फंड इंडियाच्या बोर्ड सदस्य संगीता जिंदाल यांनी व्यक्त केले. नूतनीकरण प्रकल्पाच्या संचालक सिद्धी पोतदार यांनी सांगितले की, अफगाण वॉर मेमोरियल चर्चच्या नूतनीकरणासाठी सर्वप्रथम आम्ही संपूर्ण चर्चच्या परिसराची तपासणी करून दस्तऐवजीकरण केले. विविध तज्ज्ञांनीही चर्चची पाहणी केली. चर्चच्या मूळ वास्तूला आणि सौंदर्याला धक्का न लागता नवी झळाळी कशी देता येईल, यावर आम्ही भर दिला. विविध साहित्याचा वापर करून हे चर्च बांधण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top