अभिनेते ज्युनियर मेहमूद पोटाच्या कर्करोगाने त्रस्त

मुंबई- बॉलिवुडमधील अभिनेते,गायक आणि चित्रपट निर्माते ज्युनियर मेहमूद हे अत्यवस्थ स्थितीत आहेत.त्यांना पोटाचा कर्करोग आजार झाला असून तो चौथ्या टप्प्यात पोहोचला आहे.त्यांचे शरीर इतके अशक्त झाले आहे की डॉक्टरांनी त्यांची केमोथेरपी करण्यासही नकार दिला आहे.त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी आणले आहे.

अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे खरे नाव नईम सैय्यद असे असून ते ६८ वर्षांचे आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून ते कर्करोग आजाराची झुंज देत आहेत. त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले असून एक महिन्यापूर्वी ते आजाराच्या चौथ्या टप्प्यात पोहचले असल्याचे उघड झाले.अभिनेते जॉनी लिव्हर यांनी नुकतीच त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च ते करणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले.परंतु त्यांचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोहचला असून अशक्तपणा वाढल्याने डॉक्टरांनी त्यांची केमोथेरपी करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना सध्या घरीच ठेवले आहे. ज्युनियर मेहमूद यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.ब्रम्हचारी,परवरीश,दो और दो पांच हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्यांनी काही मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top