अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शेखर सुमन पूर्वी काँग्रेसमध्ये होते. आज त्यांनी भाजपात प्रवेश केला. शेखर सुमन यांनी पटणा लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेखर यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर शेखर यांनी सांगितले की, कालपर्यंत मला कल्पना नव्हती की, मी आज इथे पक्षप्रवेश करेन. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी नकळत घडतात. मी इथे खूप सकारात्मक विचार करून आलो आहे आणि देवाचे आभार आहेत की, त्याने मला हा निर्णय घेण्याचे आदेश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top