अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा

*पत्नी तेजस्वी यांची मागणी

मुंबई- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी अथवा सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावे, अशी मागणी करणारी याचिका अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.यावर न्या.रेवती मोहिते-ढेरे व न्या.मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.न्यायालयाने याची गंभीर दखल घेत या याचिकेबाबत माहिती सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यावरील पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

तेजस्वी घोसाळकर यांच्यावतीने वकील भूषण महाडिक यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी. या पथकाचा प्रमुख डीसीपी दर्जाचा अधिकारी असावा. किंवा याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, जेणेकरून योग्य न्याय मिळू शकेल.तपास यंत्रणेने प्रगती अहवाल न्यायालयात सादर करावा.ठराविक मुदतीत तपास पूर्ण करावा. हा तपास पारदर्शक,निसंदेह व जलदगतीने व्हावा. तसेच गुन्हेगारी कट रचल्याचे कलम १२९ (ब) सह ३४ एफआयआरमध्ये समाविष्ट करावे.त्याचप्रमाणे आरोपी अमरेंद्र मिश्रा,मेहुल पारेख व अन्य आरोपींची ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर,नाका चाचणी करावी,अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top