अमित शहा मंगळवारी जम्मू-काश्मीरला जाणार

श्रीनगर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 9 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरला जाणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी अमित शहा आढावा बैठक घेणार आहेत. ते विविध विकास कामांच्या उद्घाटनासह विकास भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. त्यासोबत जम्मू-काश्मीरमध्ये ई-बस सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. अमित शहा जम्मू-काश्मीरमधील तरुणांना नोकर भरतीच्या नियुक्ती पत्रांचे वाटपही करणार आहेत. 21 डिसेंबर रोजी पूंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने पाच जवान शहीद आणि दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर शहा प्रथमच जम्मू-काश्मीराच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top