अमित शहा यांनी सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला

गांधीनगर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी अहमदाबादच्या नारणपुरा येथील शाळेत जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलानेही मतादानाचा हक्क बजावला. अमित शहा गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मतदानापूर्वी अमित शहा यांनी कामेश्वर महादेव मंदिरात पूजा केली. तुमच्या एका मतात मोठी ताकद आहे, त्यामुळे तुमच्या मताची ताकद ओळखून नक्कीच मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, असे यावेळी अमित शहा यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top