Home / News / अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड हल्ला! आरोपीला पोलिसांनी चकमकीत टिपले

अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड हल्ला! आरोपीला पोलिसांनी चकमकीत टिपले

अमृतसर – पंजाबच्या अमृतसरमधील खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिराबाहेर तीन दिवसांपूर्वी ग्रेनेड हल्ल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून...

By: Team Navakal

अमृतसर – पंजाबच्या अमृतसरमधील खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिराबाहेर तीन दिवसांपूर्वी ग्रेनेड हल्ल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून घटनास्थळावरून पळ काढला होता. आज सकाळी पोलिसांनी दोनपैकी एका हल्लेखोराला चकमकीत ठार केले.

शुक्रवारी मध्यरात्री ठाकूरद्वारा मंदिराबाहेर ग्रेनेड फेकून हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी मंदिराचा पुजारी आतमध्ये झोपला होता. तो या हल्ल्यातून पुजारी वाचला होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली होती.

अमृतसर येथील विमानतळ मार्गावर हल्लेखोर आणि पोलिसांत आज सकाळी चकमक झाली. यात एका हल्लेखोराला ठार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरसिदक ऊर्फ सिदकी ऊर्फ जगजीत सिंग असे मृत आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार चुई ऊर्प राजू सध्या फरार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या