अमेझॉन जंगलात विमान कोसळून 12 जणांचा मृत्यू

रिआ ब्रँको
ब्राझीलच्या अमेझॉन जंगलात छोटे विमान कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 महिन्यांचा मुलाचा, वैमानिक आणि सहवैमानिक समावेश आहे. एका महिन्यात अमेझॉनच्या जंगलात विमान कोसळण्याची दुसरी घटना आहे.
पर्यटकांना घेऊन हे विमान रिओ ब्रँको येथील विमानतळावरुन ॲमेझोनास राज्यातील एनवीरा या शहराकडे निघाले होते. टेक ऑफ केल्यानंतर या विमानाला काही क्षणात आग लागली. त्यानंतर हे विमान पेरू आणि बोलिव्हियाच्या सीमेजवळील ब्राझीलच्या अमेझॉन जंगलात कोसळले. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. मृत पर्यटक कोणत्या देशातील आहे, हे आता स्थानिक प्रशासन तपासत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान,17 सप्टेंबर रोजी ॲमेझॉनच्या जंगलात एका छोटे विमानाला अपघात झाला होता. ज्यात विमानातील सर्व 14 जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top