अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन

वॉशिंग्टन :

व्हिएतनाम युद्धापासून ते अमेरिका-चीन संबंधांमधील कळीच्या चर्चांपर्यंत आपल्या चाणक्यनीतीचा दीर्घकालीन प्रभाव पाडणारे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. किंसिंजर यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणात निभावलेली भूमिका अमेरिकेचे जागतिक पटलावरील स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची ठरली. कनेक्टिकटमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

७० च्या दशकात अनेक देशांसह राजनैतिक संबंध निर्माण करण्यात मोलाची भूमिका निभावणारे निर्णय घेतले होते. हेन्री किसिंजर यांनी त्या काळात अनेक देशांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले असले, तरी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मात्र त्यांचा प्रभाव किंवा भीती याचा काही फरक पडला नव्हता. इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात लष्करात सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळेही अमेरिका भारतावर चिडलेली होती. हा संताप इतका होता की, हेन्री यांनी इंदिरा गांधींसाठी अपशब्द वापरले होते.

हेन्री किसिंजर यांना व्हिएतनाम युद्धादरम्यान निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. १९७३ साली झालेल्या व्हिएतनाम युद्धबंदीसाठी त्यांनी उत्तर व्हिएतनामशी यशस्वीरीत्या चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांना व उत्तर व्हिएतनामचे ली ड्यूक थो यांना संयुक्तपणे हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. एकीकडे किसिंजर यांनी मोठ्या सन्मानाने या पुरस्काराचा स्वीकार केला असताना दुसरीकडे ली ड्यूक थो यांनी मात्र हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. किसिंजर यांच्या निवडीमुळे झालेल्या वादातूनच तत्कालीन नोबेल पुरस्कार निवड समितीतील दोन सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा त्याग केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top