अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून रॅान डिसांटिस यांची माघार,ट्रम्पना पाठिंबा

वाॅशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून रिपब्लिकन पार्टीचे आणखी एक दावेदार फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसांटिस यांनी माघार घेतली असून त्यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना खुला पाठिंबा दर्शविला आहे.याआधी आयोवा कॉकसमध्ये चौथ्या क्रमांकावर फेकले गेल्याने भारतीय वंशाचे विवेक रामस्वामी यांनी माघार घेतली आहे.

डिसांटीस हे ट्रम्प यांचे कडवे विरोधक मानले जात होते. मात्र न्यू हॅम्पशायरमध्ये होणार असलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या अंतर्गत निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना रविवारी डिसांटिस यांनी या स्पर्धेतून माघार घेत ट्रम्प यांना खुला पाठिंबा दर्शविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

न्यू हॅम्पशायरच्या या पक्षांतर्गत प्राथमिक निवडणुकीत डिसांटिस हे ट्रम्प आणि दुसर्या प्रबळ दावेदार संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी राजदूत निकी हेली यांच्यासमोर तिसर्या क्रमांकावर फेकले जातील,अशी चर्चा होती. त्यामुळेच डिसांटिस यांनी माघार घेतली असावी असे सांगितले जाते.

डिसांटिस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी एक्सवरूनच डिसांटिस यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी दावेदारी जाहीर केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top