अमेरिकेतील रस्ते अपघातात तीन भारतीय महिलांचा मृत्यू

कॅरोलिना –
अमेरिकेतील दक्षिण कैरोलिना भागात झालेल्या कार अपघातात तीन भारतीय तरुणींचा मृत्यू झाला आहे. या तिघी जणी गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील रहिवासी होत्या.
हा अपघात दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनवेल काउंटीमध्ये जॉर्जियावरुन ग्रीनवेल कडे जाणाऱ्या आय ८५ या महामार्गावर झाला. याा आ महामार्गावरुन जात असताना अतिवेगाने ही कार अनियंत्रित झाली. ती आधी या हायवेवर असलेल्या पुलाला व नंतर सहा लेन ओलांडून विरुद्ध बाजूला असलेल्या झाडावर आदळली. ती हवेत किमान २० फुट उंच उडाली असावी, असे पोलिसांनी यावेळी सांगितले. या अपघातात या कारमधील रेखा पटेल, संगीता पटेल व मनीषा पटेल या तीन महिलांचा मृत्यू झाला. हायवे गस्ती पथकाने या तिन्ही महिलांना बाहेर काढले आहे. या अपघातात या कारमधील आणखी एक व्यक्तीही गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती अमेरिकन पोलिसांनी दिली आहे.
या वाहनाने हायवेवर जाताना वेग मर्यादा ओलांडली होती. कार अतिवेगाने जात असल्याचा संदेश या कारमधील प्रणालीने त्यांच्या कुटुंबातील काही जणांना पाठवला होता. त्यांनी प्रशासनाशी संपर्कही साधला होता. मात्र तोपर्यंत हा अपघात झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top