अमेरिकेतील विद्यापीठांत इस्रायलविरोधात निदर्शने

न्यूयॉर्क- इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असून गाझा पट्टीत अक्षरशः स्मशानासारखी अवस्था आहे. रोज शेकडोंच्या संख्येने नागरिक मरत असून भूकबळीही जात आहेत. त्यामुळे इस्रायलकडून सुरू असलेले हल्ले ताबडतोब थांबवावेत, अशी मागणी करत अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना फरफटत नेले आणि ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना अटक केली.

या आंदोलनावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्येही चकमकी उडत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अटलांटा एमोरी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी इस्रायलच्या कारवाईविरोधात प्रचंड संताप व्यक्त करत निदर्शने केली. हे आंदोलन भडकू नये म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला. तसेच विद्यापीठांमध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर रबळी गोळ्यांचा वर्षावर केला. त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे अटलांटा एमोरी विद्यापीठातील प्राध्यापकाने सांगितले. विद्यार्थ्यांची इस्रायलविरोधात घोषणाबाजी सुरूच होती. गाझामध्ये प्रचंड नरसंहार सुरू असून तो थांबवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top