अमेरिकेतेतील टाईम स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठाचे लाईव्ह प्रक्षेपण

वॉशिंग्टन

अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह देशासोबतच परदेशातही दिसला. परदेशातील भारतीयांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवता यावा यासाठी अमेरिकतील प्रसिद्ध टाईम स्क्वेअरवरही रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी येथील नागरिकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम अमेरिकेतील प्रत्येक शहरात प्रसारित करण्यात आला. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर ढोल-ताशांच्या आवाजासह ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर मोठी गर्दी जमली होती. या उत्सवात शेकडो हिंदू सहभागी झाले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणासठी मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये विविध ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले. राम मंदिर उद्घाटनाचे थेट प्रक्षेपणही येथे दाखवण्यात आले.

अमेरिकेसह नेपाळ, कॅनडा यासह जगातील इतर देशांतही राममंदिर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले. टेक्सास, यूएसए येथील ‘श्री सीता राम फाऊंडेशन’चे कपिल शर्मा यांनी सांगितले की, अयोध्यानगरीत ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामांच्या मंदिराची उभारणी होत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. हा जगभरातील हिंदूंसाठी श्रद्धेचा आणि उत्सवाचा महत्त्वाचा दिवस आहे. या क्षणाचे परदेशातील भारतीयांना देखील साक्षीदार होता यावे यासाठी श्री सीता राम फाऊंडेशनने राममंदिर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नृत्य, गायन आणि संगीताचे सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top