Home / News / अमेरिकेत ट्रम्प व मस्क यांच्याविरोधात निदर्शन

अमेरिकेत ट्रम्प व मस्क यांच्याविरोधात निदर्शन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे जवळचे सहकारी व उद्योगपती एलन मस्क यांच्याविरोधात काल ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली....

By: E-Paper Navakal

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे जवळचे सहकारी व उद्योगपती एलन मस्क यांच्याविरोधात काल ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.

देशभरात जवळजवळ लाखो लोक काल रस्त्यावर उतरले. त्यानी मस्क व ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला. निदर्शकांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाई व बेरोजगारी वाढणार असून, त्याचा थेट फटका अमेरिकन नागरिकांना बसणार आहे. आपले दैनंदिन व्यवहारांमध्ये अडचणी येणार आहेत. ट्रम्प जगाला आर्थिक मंदीमध्ये ढकलत आहेत.
ट्रम्प यांनी सत्तेवर आल्या आल्या अनेक देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आयातशुल्क लावले होते. त्यामुळे जगातील विविध भागातून येणाऱ्या वस्तू चढ्या भागाने विकत घ्याव्या लागतील अशी भिती अमेरिकन नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती भागात ही निदर्शने करण्यात आली.

Web Title:
संबंधित बातम्या