अमेरिकेत पहिल्यांदाच नायट्रोजनगॅसद्वारे कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा

वॉशिंग्टन- अमेरिकेत पहिल्यांदाच एका कैद्याला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. केनेथ यूजीन स्मिथ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. उद्या स्मिथच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. या शिक्षेविरोधात त्याच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेत, ही शिक्षा म्हणजे अत्याचार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच अशा प्रकाराच्या मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.
स्मिथला १९९६ मध्ये मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता. २०२२ मध्ये त्याला विषारी इंजेक्शन देण्यात आले. पण त्यातून तो बचावला. नायट्रोजन गॅसद्वारे मृत्युदंडाची शिक्षा ही अतिशय धोक्याची पध्दत आहे. या शिक्षेमुळे संविधानाचे उल्लंघन होत असल्याचे मत स्मिथच्या वकिलांनी मांडले. संयुक्त राष्ट्रानेही स्मिथच्या शिक्षेवर आक्षेप नोंदवला आहे. ही शिक्षा अमानवीय आणि क्रूर असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे. त्यांनी स्थिथची शिक्षा स्थगित केली जावी, अशी देखील मागणी केली.
स्मिथच्या शिक्षेबाबात सरकारी वकिलांना न्यायालयात सांगितले की, शिक्षेवेळी सर्वात आधी स्मिथला स्ट्रेचरवर झोपवले जाईल. यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक मास्क लावलाण्यात येईल. यानंतर त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात येईल. सर्वात आधी नायट्रोजन गॅस सोडला जाईल. मास्कच्या आधारे नायट्रोजन थेट त्याच्या शरीरात जाईल. मास्क असल्याने त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि त्याचा मृत्यू होईल. मास्कच्या आधारे त्याला जवळपास १५ मिनिटे नायट्रोजन गॅस दिला जाईल. नायट्रोजन गॅसमुळे काही वेळातच स्मिथ बेशुद्ध होईल आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच त्याचा मृत्यू होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top