Home / News / अयोध्या प्राणप्रतिष्ठेसाठी सज्जन वग्रह पूजन, वेदी पूजन संपन्न

अयोध्या प्राणप्रतिष्ठेसाठी सज्जन वग्रह पूजन, वेदी पूजन संपन्न

अयोध्या– अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या होणार आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून विविध धार्मिक विधी करण्यात...

By: Team Navakal


अयोध्या– अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या होणार आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून विविध धार्मिक विधी करण्यात येत आहेत. आज सकाळी साडेसहा वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाच्या विधींना सुरुवात झाली.
अयोध्येत विविध धार्मिक अनुष्ठाने, व्रतवैकल्य, पूजन अर्चन सुरु असून संपूर्ण अयोघ्यानगरी सजवण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहा वाजता मंत्राच्या उच्चारणात व रामाच्या जयघोषात वेदी पूजन करण्यात आले. त्यानंतर षोडश मंत्रांचे पाठ करण्यात आले. यावेळी सप्त मंत्रिका पूजन, त्याचप्रमाणे योगिनी पूजनाचा विधीही मोठ्या भक्तीभावाने करण्यात आला. राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी या वास्तूचे पूजनही आज करण्यात आले. या वास्तूचे रक्षण करणाऱ्या क्षेत्र पाल पूजनाचा विधी प्रमुख होता. त्याचबरोबर सर्वतोभद्र पूजन, नवग्रह पूजन, त्याचप्रमाणे यज्ञकुंड संस्काराचा विधीही करण्यात आला. यावेळी १९७५ मंत्रांच्या माध्यमातून अग्नि देवाला आहुती देण्यात येणार आहे. कुश कंडिका, प्रणिता प्रोक्षनी स्थापना व अग्नि सिंचन विधीही आज करण्यात आला. या विधींनंतर पंच वारुणी हवनही करण्यात आले. उद्या या रामदरबाराची प्राणप्रतिष्ठा असून त्या निमित्तानेही विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लक्षावधी भाविक सध्या अयोध्येत आले असून त्यांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या