अयोध्या मंदिर सोहळ्यासाठी ‘सिद्धिविनायक’ची शोभा यात्रा

मुंबई – अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित उत्सवाचा एक भाग म्हणून सिद्धिविनायक मंदिराच्यावतीने सोमवार २२ जानेवारी रोजी दादर आणि प्रभादेवी परिसरात भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे.

हजारो भाविकांचा सहभाग असलेली ही शोभायात्रा परिसरातील पाच मंदिरांच्या मार्गाने प्रवास करेल. दुपारी ३ वाजता सिद्धिविनायक मंदिरापासून सुरू होणारी ही मिरवणूक मारुती (हनुमान) मंदिर,एसके बोले रोड, सयानी रोडवरील शंकर (शिवा) आणि विठ्ठल तीर्थस्थाने आणि न्यू प्रभादेवी रोडवरील प्रभादेवी मंदिर आदी ठिकाणी थांबून सायंकाळी ७ वाजता सिद्धिविनायक मंदिरात महाआरतीसाठी परतेल.त्यानंतर रात्री ८ वाजता महाप्रसाद वाटप होईल.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद सरवणकर म्हणाले की,”हिंदू समुदायासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. राम मंदिराचे उद्घाटन हा आनंदाचा प्रसंग आहे आणि आम्हाला या उत्सवात सहभागी व्हायचे आहे.तरी आम्ही सर्व गणेशभक्तांना या उत्सवासाठी आमंत्रित करत आहोत.मिरवणुकीत भाविकांच्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असेल.या दिवशी सिद्धिविनायक मंदिर दिवे आणि विद्युत रोषणाईने उजळले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top