अयोध्या राम मंदिर उदघाटनाचे कंगना रणौतला आमंत्रणच नाही

अयोध्या –

अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील फक्त पाचच कलाकारांना आमंत्रण देण्यात आले आहे, मात्र यात अभिनेत्री कंगना रणौतला आमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

या आमंत्रितांमध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया यांना बोलावण्यात आले आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आशा भोसले, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, उद्योगपती मुकेश अंबानी यांनाही आमंत्रणे पाठवली आहेत. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ३ हजार व्हीव्हीआयपींसह एकूण ७ हजार लोकांना आमंत्रित केले आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top